श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही यामागे काय होते काय झाले यात पडायचे नाही श्रीरामपुरात पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात नागरिकांना द्या अशा सूचना नवनिर्वाचित लोकनियुक्त अध्यक्ष करण ससाने यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना दिले आहेत. आ.हेमंत ओगले यांच्या मार्फत आपण पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त आवर्तनाची मागणी करणार असल्याचे देखील ससाणे यांनी सांगितले.
काल नगरपरिषदेने जाहीर केले की एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार त्या संदर्भात तातडीने नगराध्यक्ष ससाणे यांनी नगरसेवकांसह साठवण तलाव गाठत पाहणी केली आणि पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाबासाहेब दिघे, ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, राजेंद्र पवार सर, योगेश जाधव, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, लकी सेठी, सुभाष पोटे, दिपक वमने, बिट्टू कक्कड, निलेश नागले, संतोष परदेशी, रितेश एडके, अफरोज शहा, प्रवीण कोठावळे, अभिजित लिप्टे, सिद्धार्थ सोनवणे, सागर कुऱ्हाडे, भाग्येश लोखंडे, अतुल शेटे, नगरआभियंता अभिजित मराठे, निलेश बकाल उपस्थित होते.
नगराध्यक्ष ससाणे म्हणाले की, श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देणारा असून त्यामध्ये पाणी, आरोग्य, लाईट आणि बांधकाम या विभागांमध्ये तातडीनं बदल करणे आवश्यक आहे त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे देखील ससाणे यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष ससाने हे लवकरच नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार असून त्या अगोदर त्यांनी साठवण तलावाची पाहणी करून पिण्याच्या पाण्याचा आढावा घेतला आहे.
नगराध्यक्ष ससाणे यांनी पहिले पत्र पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याबाबत मागणी केली. श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे, राजश्रीताई ससाणे यांच्या कार्यशैली प्रमाणेच करण ससाणे यांचे कामकाज राहिल यात तिळमात्र शंका नसल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले.



