spot_img
spot_img

धक्कादायक! जामखेड शहरात बापलेकाची गळफास घेऊन आत्महत्या 

जामखेड (जनता आवाज वृत्तसेवा):- जामखेड शहरातील नविन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजुला असलेल्या एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विषेश म्हणजे ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतला त्याच मॅटच्या कपड्याने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. कानिफनाथ ज्ञानदेव पवार, वय 45 व सचित कानिफनाथ पवार, वय 16 रा. आरोळे वस्ती, जामखेड आशी गळफास घेतलेल्या बापलेकाची नावे आहेत. आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नसुन या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड शहरातील आरोळे वस्ती याठिकाणी मयत कानिफनाथ ज्ञानदेव पवार हा आपल्या कुटुंबासह रहात होता. दोन तीन दिवसांपुर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. याच दरम्यान शुक्रवार दि 2 जानेवारी 2026 रोजी रात्री कानिफनाथ याचा मुलगा सचित कानिफनाथ पवार, वय 16 या बापलेकाचे घरगुती कारणावरून वाद झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलगा सचित हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघुन गेला.

यानंतर वडील कानिफनाथ पवार याने रात्री मुलाचा आजुबाजुला शोध घेतला मात्र तो मिळुन आला नाही. यानंतर वडील पुन्हा पहाटेच्या सुमारास मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी वडील कानिफनाथ यांना मुलाने नविन कोर्टरोड व म्हाडा कॉलनीच्या बाजुला असलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहीले. त्यामुळे वडीलांना हा धक्का सहन झाला नसावा म्हणून त्यांनी मुलाचा मृतदेह खाली घेतला. यानंतर मुलाने ज्या मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच मॅटच्या कपड्याने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

घटनेची माहिती समजतात घटनास्थळी नगरसेवक महेश निमोणकर व संतोष गव्हाळे यांनी धाव घेतली. घटनास्थळी सा. पो. उपनिरीक्षक शिवाजी कदम व पो. कॉ. सचिन देवडे हे देखील दाखल झाले. यानंतर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना देण्यात आली.

यानंतर संजय कोठारी व दिपक भोरे यांनी आपल्या रुग्णवाहिका घेऊन मृतदेह जामखेड ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उमासे यांनी दोघाना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करित आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!