प्रदीप आहेर आहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-मोराचा पिसारा जसा हळूहळू फुलत जातो आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतो, तशीच सध्या ‘गॅस’ची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मुरलीच्या बासरीसारखी नादमय झालेली ही चर्चा आता मंत्रमुग्ध करत असून, रोजच्या गप्पांमध्ये हा विषय हमखास डोकावतो आहे. चहाच्या टपरीपासून रात्रीच्या बैठकींपर्यंत गॅसवर चर्चा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
या चर्चेत अनुभव, तर्क-वितर्क आणि ऐकीव माहिती यांची सरमिसळ होत आहे. कुणासाठी हा विषय विनोदाचा ठरत असला, तरी काहींसाठी तो चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
सोशल मीडियावरही यासंदर्भातील पोस्ट, झळकत आहेत. या सगळ्या गदारोळात मोराचा पिसाराच प्रकाशात सर्वांना अधिक ठळकपणे दिसत आहे. यावेळी मुरलीच्या बासरीचे सूर ऐकू येत आहे. या सूरानेच सर्व एकत्र आले आहे. त्यामुळेच चर्चेचा झगमगाट जास्त असून, मूळ मुद्द्याकडे पाहण्याची गरज असल्याचे काहींचे मत आहे. तरीही, सध्या तरी गॅसची ही चर्चा मोरपिसाऱ्यासारखी फुलतच असल्याचे चित्र आहे.



