कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथील बेलापूर रोड लगत असलेल्या बाग मळ्यात बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान येथील कोल्हार बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे यांच्या घराजवळील रमेश खर्डे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वीच पिंजरा लावण्यात आला होता. यामध्ये साधारण आठ ते नऊ वर्षाची बिबट्या(मादी) जेरबंद झाली आहे.
मागील पंधरा दिवसापासून बाग मळ्यातील शेत शिवारामध्ये बिबट्याचे नित्य दर्शन घडत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले असता येथील कोल्हार बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे यांनी तातडीने निर्णय घेऊन वन्य अधिकारी प्रतीक गजेवार व रेस्क्यू टीमचे अनिल जाधव यांच्याशी संपर्क करत येथे पिंजरा पिंजरा लावला. या पिंजऱ्यामध्ये बिबट्या (मादी )जेरबंद झाल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याने येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून येथे आणखी बिबटे असण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा आणखी एक पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाला केली आहे.
तरी यापुढे देखील नागरिकांनी सतर्क राहून वन विभागाशी तातडीने संपर्क करावा त्याचबरोबर आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन वन अधिकारी प्रतीक गजेवार यांनी केले आहे.



