spot_img
spot_img

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होते – ॲड. स्नेहल घाडगे पाटील

तेलकुडगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर,त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय,तसेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ढोरजळगाव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसाधना शिबिर दि. 23 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत तेलकुडगाव (ता. नेवासा) येथे यशस्वीपणे पार पडले. या सात दिवसीय शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मच्छिंद्र म्हस्के पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. स्नेहल घाडगे पाटील उपस्थित होत्या,तसेच श्री. मच्छिंद्र म्हस्के (संचालक, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना), श्री. अण्णासाहेब घाडगेपाटील, श्री. सतीश काळे, काकासाहेब काळे, गोरक्षनाथ घोडेचोर यांच्यासह प्राचार्य डॉ. चांगदेव आरसुळे, प्राचार्य डॉ. सुनील चोळके, प्राचार्य संध्या भंगाळे, डॉ. अनुराधा गोरे, सौ.मनिषा राऊत (तेलकुडगाव संकुलन प्रशासक),अरुण घाडगे पाटील, ह.भ.प. श्रीधर घाडगे पाटील, ह.भ.प. अमोल घाडगे पाटील, प्रा. प्रांजल थोरात, प्रा. सारिका नागरे, प्रा. प्रदीप नवल, प्रा. संदीप घोडेचोर, प्रा. सोमनाथ खेडकर, प्रा.निकिता बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना ॲड. स्नेहल घाडगे पाटील म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, सेवाभाव आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी प्रभावी चळवळ आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित होते तसेच समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते.

शिबिराच्या कालावधीत स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान, श्रमदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य व व्यसनमुक्ती विषयक जनजागृती, तसेच सामाजिक प्रबोधन अशा विविध उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. प्रदीप नवल यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. राहुल बोरुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष जावळे यांनी मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवर्ग, स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!