तेलकुडगाव(जनता आवाज वृत्तसेवा): – त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमांतर्गत तेलकुडगाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच मोकळ्या जागा स्वच्छ करून स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. “स्वच्छ गाव – सुंदर गाव” या संकल्पनेतून सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या वेळी त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, त्रिमूर्ती ग्रामीण फार्मसी कॉलेज तसेच त्रिमूर्ती कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या समन्वयक प्रा. डॉ. गोरे मॅडम यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करून समाजसेवेच्या अशा उपक्रमांत सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागरे सारिका, प्रा. पालवे भास्कर, प्रा. सोनवणे गोरक्षनाथ, तसेच इतर शिक्षकवृंद व महाविद्यालय प्रशासन यांनी मोलाचे सहकार्य केले.



