spot_img
spot_img

शिर्डी येथे हॉटेल कामगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, या घटनेने शिर्डीमध्ये खळबळ

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी येथील एका नामांकित हॉटेलमध्ये याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुण कामगारांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शिर्डी व परिसरात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी शहरात एका नामांकित हॉटेलमध्ये काम करणारा बावीस वर्षीय विशाल रवींद्र वायकर, राहणार गणेश नगर तालुका राहता याने कामाला असणाऱ्याच हॉटेलमधील एका रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल दुपारपासून या हॉटेलमधील संबंधित रूमचा दरवाजातून आतुन बंद होता. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला आज संशय आला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद आतून न मिळाल्याने आणखी संशय बळवल्याने या हॉटेल व्यवस्थापनाने शिर्डी पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली असता शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व दरवाजा उघडण्यात आला.

त्यावेळी विशाल रवींद्र वायकर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी पंचनामा करून संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन राहता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या संदर्भात त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे .त्यांने आत्महत्या का केली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. मात्र या तरुण हॉटेल कामगारांची आत्महत्येमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत होती.

यासंदर्भात अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!