spot_img
spot_img

महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीची औपचारिकता आज पूर्ण झाली. महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आणि महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी अधिकृत घोषणा करत दोघांचा सत्कार केला.महापौर व उपमहापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी झाल्यानंतर कोणताही विरोधी अर्ज नसल्याने ही निवड बिनविरोध ठरली.

त्यामुळे महानगरपालिकेतील राजकीय वातावरणात सौहार्द आणि समन्वयाचे चित्र दिसून आले. निवडीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा संदेश दिला.महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनीही नागरी सुविधा,पायाभूत विकास, स्वच्छता,पाणीपुरवठा आणि नागरिकाभिमुख प्रशासन यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नवनिर्वाचित महापौर ज्योती गाडे यांनी शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.तर उपमहापौर धनंजय जाधव यांनी महापालिकेच्या माध्यमातून जनहिताच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आश्वासन दिले.या निवडीमुळे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कारभाराला नवसंजीवनी मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त होत असून आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवली . त्यामध्ये आमदार संग्राम  जगताप व  डॉ. सुजय विखे पाटील यांनी एकत्रित येऊन महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीमध्ये दादा भैया जोडीने एकहाती सत्ता आणली. या निवडणुकीमध्ये विरोधकाला कुठलेही यश मिळाले नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!