spot_img
spot_img

दुर्गापूर येथे बिबट्या जेरबंद

दुर्गापूर(जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील बिरोबा मंदिर जवळ पुलाटे वस्तीवर चंद्रशेखर बाळकृष्ण पुलाटे यांच्या गट नंबर २७० मध्ये जांभूळ बागेत बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले.

गेल्या महिन्यापासून दुर्गापूर येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या कोंबडीच्या सावजाला आकर्षून पिंजऱ्यात जेरबंद झाला. चार पाच दिवसापासून हा बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत होता तो पिंजऱ्या भोवती फिरत होता पण पिंजऱ्यात जात नव्हता परंतु काल सोमवार दिनांक ९/२/२०२५ रोजी पहाटे पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबडीला आकर्षून तो अलगत जेरबंद झाला.

बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच ट्रक सोसायटीचे उपाध्यक्ष सुनिलभाऊ जाधव व पोलिस पाटील दिलीपराव पुलाटे यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतिक गजेवर व प्राणीमित्र विकास म्हस्के घटना स्थळी पोहचले व अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल,सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच वनरक्षक प्रतिक गजेवर, प्राणीमित्र विकास म्हस्के, आपदा मित्र अनिल जाधव, मंडू खेमनर हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जेरबंद बिबट्या हलविण्याची कार्यवाही केली.

जेरबंद झालेला बिबट्या हा ११ ते १२ वर्षं वयाचा नर जातीचा आहे. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट्या पाहण्यासाठी परिसरातून खुप लोकं जमा झाली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिस पाटील दिलीपराव पुलाटे, दशरथ नेहे, अनिल पुलाटे, पत्रकार यमन पुलाटे,लक्ष्मण पुलाटे, निखिल पुलाटे, हर्षवर्धन पुलाटे,अशोककाका पुलाटे, कोंडीराम पुलाटे यांनी मदत केली.

हा एक बिबट्या जरी पकडला तरी अजुन दोन बिबटे परिसरात आहे आणि ऊस तोड अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे लपन कमी होणार आहे व बिबट्यांचा उपद्रव वाढणार आहे.तरी कृपया याच भागात परत पिंजरा लावावा अशी मागणी दुर्गापूर ग्रामस्थांनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!