spot_img
spot_img

श्रीरामपुरात प्राथमिक शाळेतील शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- येथील द. वा. जोशी प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाविरुद्ध आठ वर्षीय विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिलेची (वय २५) मुलगी दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. संबंधित शिक्षक ‘सचिन’ हा गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून वर्गशिक्षक म्हणून कार्यरत होता.

दि. १० फेब्रुवारी रोजी शाळेत असताना शिक्षकाने विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलीने हा प्रकार आईला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच वर्गातील इतर काही मुलींशीही अशाच प्रकारचे वर्तन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

यानंतर संबंधित पालकांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाच्या सूचनेनुसार पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गु.र.नं. १०१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६४(F), ६५(२), ७४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४(२), ६, ८, १० व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!