30 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोनगांव येथील आदिवासी बांधवांना रेशकार्ड वाटप 

सोनगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-सोनगांव ता.राहुरी येथील 25 आदिवासी बांधवाना आज आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे प्रयत्नातुन रेशनकार्डचेवाटप मा.नगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समितीच्या मा.सदस्या डॉ.सौ.उषाताई तनपुरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना सौ.तनपुरे म्हणाल्या की, आमदार प्राजक्त तनपुरे आदिवासी राज्यमंत्री असतांना आदिवासी कुटुंबाना शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या होत्या कोरोना काळात किराणा किटचे वाटप ,मानधन म्हणुन रु.2000 तसेच जातीचे दाखले ,मोफत विज कनेक्शन आदि योजना प्रभावीपणे मतदारसंघात राबविल्या त्यानुसार आज आदिवासी 25 आदिवासी कुटुंबाना रेशन कार्डचे वाटप होत आहे. त्यामुळे या आदिवासी बांधवांच्या कुटुंबाना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ आदिवासी कुटुंबांनी घ्यावा असे अवाहन सौ.तनपुरे यांनी केले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश चिटणीस मिलींद अनाप, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब खुळे ,पंचायत समितीचे मा.सदस्य सचिन भिंगारदे,नरेंद्र अनाप ,किशोर पातोरे ,चंद्रकांत कदम तसेच आदिवासी लाभार्थी विजय मोरे,दिपक मोरे, शाम मोरे ,रविंद्र मोरे, अनिल मोरे, सौ.शोभाताई मोरे ,सुनिल मोरे आदि आदिवासी बांधव उपस्थीत होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!