spot_img
spot_img

गुंतवणुकीच्या आमिषाने अभिनेत्रींची फसवणूक वर्षा उसगांवकरांसह पाच जणांकडून ४७ लाख उकळले

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा यांच्यासह काही अभिनेत्रींची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल ४७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी दिग्दर्शक व बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव याच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांची ओळख अविनाश जाधव याच्याशी होती. स्वतःला चित्रपट निर्माता तसेच बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत जाधवने डोंबिवली येथील बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे आमिष दाखवले. तसेच वर्षभरात मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासनही दिले.

जाधवच्या या आश्वासनांवर विश्वास ठेवून वर्षा उसगांवकर, मृणालिनी जांभळे आणि आणखी तीन जणांनी मिळून चेक व ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण ४७ लाख रुपये त्याच्याकडे गुंतवले. सुरुवातीला जाधवने काही रक्कम परत केली; मात्र त्यानंतर पैसे देणे पूर्णपणे थांबवले.

दरम्यान, पैसे परत मिळावेत यासाठी वर्षा उसगांवकर आणि इतरांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधवने मोबाईल क्रमांक तसेच राहत्या घराचा पत्ताही बदलल्याने संपर्क तुटला. अखेर पीडितांनी डोंबिवली येथे जाऊन जाधवला जाब विचारला असता, “मी पैसे देणार नाही, जे करायचे ते करा,” असे उत्तर देत त्याने धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात फसवणूक व धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अभिनेत्रींसह इतर गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याने चित्रपटसृष्टीतही या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!