कोपरगांव(जनता आवाज वृत्तसेवा): संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व उरल फेडरल युविव्हर्सिटी (उर्फु),रशिया यांच्यातील परस्पर सामंजस्य करारानुसार संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच विध्यार्थ्यांनी विध्यार्थी देवाणघेवाण उपक्रमांतर्गत यंत्र अभियांत्रिकी, रोबोटिक्स व व्यवसायातील नवकल्पनांवर आयटी क्षेत्राशी निगडीत तीन आठवड्याांची लघु संशोधन इंटर्नशिप (आंतरवासिता) उर्फु, रशिया येथे यशस्वी पुर्ण केली, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंउदन केले तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी तेजस अनिल निकुंभ, हेमासाई श्रीनिवासराव थोटा, चिन्मय ओमकार बिटने, नवनाथ सचिन काटे व उत्कर्ष देवेंद्र देवळालीकर या पाच विध्यार्थ्यांचा व त्यांच्या बरोबर गेलेले प्राद्यापकांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केली. यावेळी चिफ टेक्नॉलॉजिकल ऑफिसर श्री विजय नायडू, डायरेक्टर डॉ. अजयकुमार ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे, डॉ. बाळासाहेब आगरकर, डॉ. प्रसाद पटारे, इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र गवळी व विध्यार्थ्यां समवेत रषियाला गेलेले प्रा.सुधांशु भट उपस्थित होते.
उर्फु बरोबर संजीवनीचा सामंजस्य करार असल्यामुळे संजीवनीच्या पाचही विध्यार्थी व एक प्राद्यापक यांचा सर्व निवास व जेवणाचा खर्च उर्फुने केला. इंटर्नशिप दरम्यान संजीवनीच्या विध्यार्थ्यांनी सॉलिड वर्क्स, कॉम्पोस, एबीबी यासारख्या आधुनिक सॉफ्टेवेअरवर संशोधन केले. या इंटर्नशिप तृतिय वर्षाच्या इच्छुक विध्यार्थ्यांनी आपापल्या विभागात प्रथम बायोडेटा जमा केला. त्यांची उर्फुद्वारे कॉलेज मध्येच परीक्षा घेण्यात आली. यात पाच विध्यार्थ्यांची निवड झाली.
{संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सर्वच संस्थांमधिल विध्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे, कार्पोरेट जगताची ओळख व्हावी तसेच विध्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी व जागतिक आव्हाने पेलण्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी जगातील नामांकित विद्यापीठे व संस्थांशी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने सामंजस्य करार केले आहेत. यात प्रामुख्याने लोगस वर्ल्ड (जर्मनी), शेनकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (इस्त्राएल), पोझनान युनिव्हर्सिटी (पोलंड), इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (कम्बोडिया), नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटी ( सावुथ आफ्रिका), उरल फेडरल युनिव्हर्सिटी (रशिया ), टॅरिअॅक अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (फिलिपाईन्स), लेथब्रीज युनिव्हर्सिटी (कॅनडा) व आरडब्ल्युटीएच आचेन युनिव्हर्सिटी (जर्मनी)यांचा समावेश आहे. यापुर्वीही अनेक विध्यार्थ्यांनी व प्राद्यापकांना सामंजस्य कराराचे फायदे झाले आहेत. उर्फु ची दर्जा व गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारी ही३३१ असल्यामुळे भविष्यात या विध्यार्थ्यांना जगात कोठेही नोकरीसाठी प्राधान्य असेल. संजीवनीच्या संस्था जरी ग्रामिण भागात असल्यातरी वर्ल्डक्लास एज्युकेशन देण्यासाठी कोठेही मागे नाही.}-श्री अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
[उर्फु मध्ये इंटर्नशिप पुर्ण करीत असताना तेथिल प्राद्यापकांनी आम्हाला संशोधनात्मक मार्गदर्शन केले. तेथिल शिक्षण पध्दती ही प्रात्यक्षिक आणि उद्योगाभिमुख आहे. परीक्षेमध्ये मार्कस मिळतात ते इंडस्ट्रीमध्ये केलेल्या कार्याबध्दल मिळतात. लेखी परीक्षा ही ऑपशनल असते. या इंटर्नशिपमुळे मला भविष्यात एमएस करण्यासाठी उर्फु मध्ये शिष्यवृत्ती मिळुन प्रवेश मिळू शकतो तसेच रशिया मध्ये नोकरी मिळण्याचा मार्गही सुकर झाला आहे. या इंटर्नशिपमुळे माझा बायोडेटा अधिक परीणामकारक होणार असुन मला नोकरीच्या संधी मिळण्यास उपयोग होईल. मला रशिया मध्ये तेही जगातील नामांकित विद्यापीठामध्ये मोफत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली, याचे सर्व श्रेय मी माझ्या कॉलेजला देते.]-विध्यार्थीनी हेमासाई थोटा.



