पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):-बूट आणि लेदर वस्तूंच्या प्रीमियम देखभालीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘United Shine – Premium Shoe & Leather Care’ या आगळ्यावेगळ्या स्टार्टअप संकल्पनेच्या पहिल्या आउटलेटचा शुभारंभ नुकताच विमान नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या नव्या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिजित घाटगे (संस्थापक – Pokket Cafe), वैभव फरतडे (प्रदेशाध्यक्ष – मराठा उद्योजक लॉबी), कृष्णा निडवंचे (संस्थापक – नादब्रह्म इडली) यांच्यासह अमित बागवे आणि सौ. रचना लचके बागवे (संस्थापक – अर्थसंकेत), सोमनाथ शिनगारे (संस्थापक – Jaggery Tales), सौ. ऐश्वर्या पठारे (नगरसेवक – पुणे महापालिका) आणि डॉ. दादा कोद्रे (नगरसेवक – पुणे महापालिका) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी पुणे शहरात अशा प्रकारच्या प्रीमियम शू आणि लेदर केअर सेवांची आवश्यकता अधोरेखित करत या उपक्रमाचे कौतुक केले.
‘United Shine’ या स्टार्टअपची कल्पना ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाचे लेखक विजय गोपाळराव पवार आणि ‘इनोव्हेटिव्ह लॉंड्री बास्केट’ या व्यवसायाचे संस्थापक वैभव होळसांबरे या दोन तरुण उद्योजकांनी प्रत्यक्षात आणली आहे. बूट आणि लेदर वस्तूंना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुन्हा नवीनसारखी चमक देण्याची संकल्पना या उपक्रमातून साकारण्यात आली आहे.
या स्टुडिओमध्ये शू क्लिनिंग, स्नीकर्स क्लिनिंग, लेदर शूज पॉलिशिंग तसेच लेदर बॅग आणि इतर लेदर वस्तूंचे रिस्टोरेशन अशा प्रीमियम सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच या आउटलेटच्या माध्यमातून ‘Veltan’ या नव्या लेदर प्रोडक्ट्स ब्रँडचीही सुरुवात करण्यात आली आहे. या ब्रँड अंतर्गत हँडमेड कोल्हापुरी चप्पल, प्रिमियम लेदर शूज, लेदर बॅग्ज, लेदर बेल्ट्स आणि लेदर वॉलेट्स यांसारखी विविध उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. Shop No. 3, Shalimar Triumph, Opp. Viman Prestige Society, Clover Park, Viman Nagar, Pune – 411014 येथे सुरू झालेल्या या स्टार्टअप उपक्रमाचे पुण्यातील विविध स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.



