spot_img
spot_img

मापरवाडी येथील शेतकर्‍याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-  तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे सोमनाथ जिजाबापू गाडगे या शेतकर्‍याचा आज सायंकाळी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. . मापरवाडी येथील घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीत त्यांनी कांदा लागवड  केलेली होती. आज काही महिला मजुरांना कांदा  काढणीचे काम दिले होते. दिवसभर कांद्याची काढणी केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

महिला मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागदाच्या आश्रयाला असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ यांच्यावर वीज कोसळली. मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ सोमनाथ यांच्या अंगावर कोसळले. जागेवरच त्यांचा मृत्यू  झाला.

सोमनाथ यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई असा परिवार आहे. या घटनेने लोणी खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. घटना घडल्यानंतर सोमनाथ यांना प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!