spot_img
spot_img

संगमनेरला दुसऱ्याही दिवशी गारपीट आणि अवकाळीचा तडाखा  गहू, कांदा, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील निमज व धांदरफळ परिसराला अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही निसर्गाचा कहर सुरूच राहिला.निमगाव बु।। निमगाव खुर्द मेंगाळवाडी सावरचोळ पेमगिरी नांदुरी सांगवी परिसरात जोरदार अवकाळी गारपिटीचा पाऊस झाला आहे या अवकाळी पावसाने शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ निमज डेरेवाडी गोडसेवाडी या भागाला रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले त्यानंतर आज सोमवारी दुपारनंतर अचानक गारपीट आणि जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.

या अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे शेतातील गहू, कांदा आणि डाळिंब या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी शेतामध्ये काढून ठेवलेला तर काही ठिकाणी शेतात असलेला गहू पूर्णपणे भिजून गेला आहे तसेच टोमॅटो आणि कांदा पिकामध्ये पाणी साचल्यामुळे तो सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच डाळिंब बागांनाही या गारपिटीचा मोठा फटका बसला असून फळांची गळती मोठ्या प्रमाणा मध्ये झाली आहे.

यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर या अवकाळी पावसामुळे आणखी एक संकट पावसामुळे उभे राहिले आहे नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसा मुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!