spot_img
spot_img

‘आयआयटी वाले बाबा’ विवाहबंधनात; अध्यात्मातून संसाराकडे अनपेक्षित वळण

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-महाकुंभ मेळ्यात भगवी वस्त्रे, लांब दाढी आणि आयआयटी शिक्षणामुळे चर्चेत आलेले ‘आयआयटी वाले बाबा’ म्हणून ओळखले जाणारे अभय सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण ठरले ते त्यांच्या विवाहाचे. अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या अभय सिंह यांनी आता संसाराची नवी सुरुवात करत विवाहबंधनात अडकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

मूळ हरियाणातील अभय सिंह यांनी कर्नाटकातील सॉफ्टवेअर अभियंता प्रतीका यांच्याशी विवाह केला आहे. सोमवारी हरियाणातील झज्जर येथे वडिलांच्या कार्यालयात ते पत्नी प्रतीका यांच्यासह दाखल झाल्यानंतर त्यांच्या विवाहाची माहिती समोर आली.

अभय सिंह यांनी १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात पारंपरिक पद्धतीने विवाह केला. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी दोघांनी न्यायालयीन विवाहही नोंदवला. अभय सिंह आणि प्रतीका यांची ओळख सुमारे वर्षभरापूर्वी झाली होती. प्रतीका या मूळच्या बेंगळुरू येथील असून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

महाकुंभ मेळ्यात ‘मी आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केले आहे’ असे सांगणाऱ्या अभय सिंह यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. त्यांच्या वेशभूषेमुळे आणि अध्यात्मिक जीवनशैलीमुळे ते चर्चेचा विषय ठरले होते. काही वेळा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, अध्यात्माचा मार्ग स्वीकारलेल्या ‘आयआयटी वाले बाबा’ यांनी विवाह करून आयुष्याला नवे वळण दिल्याने त्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!