spot_img
spot_img

लोणी बुद्रुकमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम-जप व गुरूचरित्र पारायण सप्ताह

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा) :-  राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप-यज्ञ व गुरूचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

गुरुवार, दि. ८ एप्रिल २०२५ ते बुधवार, दि. १५ एप्रिल २०२५ या कालावधीत हा आध्यात्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे.

या सप्ताहात भाविकांसाठी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मानवी जीवनातील अडचणी, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक समस्या, आरोग्य, विवाह, नोकरी तसेच संततीसंबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने विशेष सेवा व पूजाविधी ठेवण्यात आले आहेत.

दि. ८ ते १५ सप्ताहाच्या कालावधीत ग्रामदेवता सन्मान, मंडळ स्थापना, अधिष्ठापन व हवन, गणेश याग, मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, पितृ याग, मल्हारी याग आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत. सप्ताहाच्या अखेरीस बलि पूर्णाहुती, सत्यनारायण पूजा, अखंड नाम-जप यज्ञ व देवता विसर्जन होणार आहे.

दररोज सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत सामूहिक गुरूचरित्र पारायण होणार असून, सकाळी ६.३० वाजता अभिषेक, ७.३० सामूहिक औदुंबर प्रदक्षिणा, सकाळी ९.३० ते ११.०० या वेळेत विशेष याग होणार आहेत. दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत श्री स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशती पारायण, सायंकाळी ५.३० वाजता प्रदक्षिणा, ६.३० वाजता नैवद्य आरती आणि रात्री ७.०० वाजता स्वाध्याय व सामुदायिक नामस्मरण होणार आहे.

महिला सेवेकरी सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत, तर पुरुष सेवेकरी रात्री ८.०० ते सकाळी ८.०० या वेळेत सेवा बजावणार आहेत.

श्री गुरूचरित्र पारायणाला वेदसमान मानले जात असून, यामुळे मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक उन्नती मिळते त्यामुळे या सप्ताहात महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!