10.4 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

शहीद जवानांच्या स्मरणार्थ आयोजित गौरव रॅलीत सहभागी होऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी केला वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा): भारतमातेचे रक्षण करताना कोपरगाव तालुक्यातील पाच शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहीद जवानांचे स्मरण, गौरव व अभिवादन करण्यासाठी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘शहीद जवान अमर रहे’ अशा विविध घोषणा देत, हातात तिरंगा ध्वज घेऊन चैतन्यमय वातावरणात आज रविवारी कोपरगाव शहरातून भव्य गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी सहभागी होऊन शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान करून विनम्र अभिवादन केले.  

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले बलिदान दिले, ज्यांनी निःस्वार्थपणे देशाची सेवा केली अशा स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, शहीद जवानांचे स्मरण करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘वीरांना वंदन, मातीला नमन’ या उपक्रमांतर्गत कोपरगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन व साईसेवा भक्त मंडळ यांच्या वतीने रविवारी (१३ ऑगस्ट) शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून छत्रपती शिवाजी स्मारक, वीर सावरकर चौक, एस. जी. विद्यालय, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे धारणगाव रोडवरून परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान अशी गौरव रॅली आयोजित करण्यात आली होती.

या रॅलीत फुलांनी सजविलेल्या केलेल्या ट्रॅक्टरमध्ये भारतमातेच्या प्रतिमेसोबत देशाचे रक्षण करताना शहीद झालेले कोपरगाव तालुक्यातील सुभेदार सुनील रावसाहेब वलटे (रा. दहेगाव बोलका) यांची वीरपत्नी मंगलाताई वलटे, हवालदार अमोल माधवराव जाधव (रा. मुर्शतपूर) यांची वीरपत्नी शोभाताई जाधव, हवालदार दीपक कृष्णा आहेर (रा. कोळपेवाडी) यांची वीरपत्नी कल्पनाताई आहेर, नायक पुंजाहरी चांगदेव भालेराव (रा. ओगदी) यांचे बंधू जितेंद्र भालेराव, शिपाई बाळू नाना पगारे (रा. भोजडे) यांची आई चंद्रभागा पगारे तसेच त्यांची मुले विराजमान झाली होती. रॅलीला प्रारंभ होताना माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी या वीरमाता व वीरपत्नींवर पुष्पवृष्टी करत वंदन केले व त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांची आस्थेने विचारपूस केली. भारतमातेच्या रक्षणासाठी कोपरगाव तालुक्यातील पाच भूमिपुत्रांनी आपले बलिदान दिले, त्यांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. आम्ही व सर्व देशवासीय त्यांचे बलिदान कधीही विसरू शकत नाही, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी सर्व वीरमाता व वीरपत्नींच्या त्याग व समर्पणाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. नंतर त्यांनी पायी चालत या रॅलीत सहभाग नोंदवला. या रॅलीच्या अग्रभागी बॅंड पथक, स्काऊट-गाईड पथक, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) विद्यार्थी होते. हातात तिरंगा ध्वज तसेच ‘वीरांना वंदन, मातीला नमन’, ‘जय जवान, जय किसान’, असे विविध फलक घेऊन काढलेल्या या रॅलीतील ‘ए मेरे वतन के लोगो…’, ‘मेरे देश की धरती…’, ‘हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए…’ यासारख्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण चैतन्यदायी बनले होते. रॅलीत ‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’ चा गजर करणारे शालेय विद्यार्थी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी विविध पक्ष, संस्था, संघटना व नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

या रॅलीमध्ये माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह तहसीलदार संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, दिलीपराव दारूणकर, राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, शिल्पाताई रोहमारे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, जितेंद्र रणशूर, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, नारायणशेठ अग्रवाल, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, भाजपचे शहर सरचिटणीस जयेश बडवे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, दादासाहेब नाईकवाडे, शफीकभाई सय्यद, सतीश चव्हाण, फकीर महंमद पहिलवान, संजय जगताप आदींसह कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालय, के. जे. सोमय्या महाविद्यालय, आर. जे. एस. महाविद्यालय, एस. जी. विद्यालय, के. बी. पी. माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, माधवराव आढाव विद्यालय, संजीवनी सैनिकी स्कूल, संजीवनी इंग्लिश स्कूल, नगरपालिका शाळा, शारदा इंग्लिश स्कूल, कोकमठाण येथील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर. जे. एस. विद्यालय, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन तसेच विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तहसील, पंचायत समिती, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, न. प. सफाई कर्मचारी व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परतल्यानंतर तेथे शहीद जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समृद्धी त्रिभुवन हिने ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धिंगत व्हावी यासाठी यावेळी उपस्थितांनी पंचप्राण प्रतिज्ञा केली. तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी प्रतिज्ञा वाचन केले. सूत्रसंचालन शिक्षक सुरेश गोरे व राजश्री पिंगळे तर आभार प्रदर्शन सुभेदार शांतीलाल होन यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!