वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा):-वैजापूर येथील विजेता स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने रविवारी नगर पालिका मौलाना आझाद विद्यालय वैजापूर या ठिकाणी २२वी ग्रेड बेल्ट परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली. या परीक्षेसाठी मौलाना आझाद विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक घनश्यामसिंग राजपूत हे मुख्य परिक्षक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर विशालसिंग राजपूत हे सहकारी परिक्षक म्हणून होते. विजेता स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व खेळाडूंपैकी ४७ खेळाडूंनी या परिक्षेसाठी आपला सहभाग नोंदविला होता. या परीक्षेमध्ये खेळाडूंची शारीरिक गुणवत्ता चाचणी, आवश्यक असलेली काता परीक्षा आणि लेखी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये यलो बेल्ट – आरव योगेश राजपूत, गौरव जगन्नाथ उकिर्डे, सार्थक विष्णु शिंदे, प्रसाद आप्पासाहेब संत, वैष्णव कैलास भुजाडे, प्रतीक दत्तात्रय तुपे, ओम नारायण पगारे, शिवम् किशोर लोखंडे, सोहम गणेश दाभाडे, मयूर प्रकाश कोळसे, वरद सचिन शेळके तर मुलींमधून गाथा गिरीश चापानेरकर, शर्वी उमेश थेटे, श्रेया अनिल जगदाळे, कोमल कैलास भुजाडे.
ऑरेंज बेल्ट -वेदांत रवींद्र गायके, कुंदन अरविंद वाघ, निसर्ग खंडेराव सोनवणे, सरफराज फैयाज कुरेशी, कृष्णा अरविंद वाघ, साईराज कैलास शेळके, प्रतीक केशव सावळे, दर्शन मुकेश बागल तर मुलींमधून निधी विशाल राजपूत, दिव्या संदीप टेके, प्रतीक्षा किशोर लोखंडे, अनुष्का सुहास भोकरे.
पर्पल बेल्ट – संस्कृत संदीप टेके, वृषभ ज्ञानेश्वर चव्हाण, अवि किशोर त्रिभुवन, रोहित संदीप शिंदे, चैतन्य रवींद्र जोशी, रोहित नानासाहेब गायके, ओम नवनाथ शिंदे, कृष्णा सुनील चक्के, यशराज दत्तात्रय दाभाडे, प्रसाद भाऊसाहेब शिंदे, प्रवीण शिवाजी भानगुडे तर मुलींमधून गौरी भगवान जोशी, गायत्री नवनाथ शिंदे, पायल रवींद्र चक्के, दिशा अण्णासाहेब शिंदे, तनिष्का सचिन बडे, भाग्यश्री रमेश शिंदे.
ग्रीन बेल्ट -देवांश निलेश नरवडे.
रेड बेल्ट -समृद्धी सागर मंत्री.
ब्राऊन बेल्ट – पवन भरत कोल्हे.
या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. वरील सर्व खेळाडू हे विजेता स्पोर्ट्स असोसिएशनच्या नियमित प्रशिक्षण वर्गांमध्ये मिक्स मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत असून खेळाडूंच्या या प्रगतीबद्दल संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र जोशी, किरण आगाज, संभाजी निकम, राजेश बुनगे, रवि वाणी यासोबतच खेळाडूंच्या शाळेतील शिक्षक तसेच पालकांच्या वतीने त्यांच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन होत आहे.




