नेवासा फाटा (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नेवासा तालुक्यात दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रमाणपत्र तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी ग्रामीण रुग्णालयात दिनांक 18/ 8 /2023 रोजी ऑनलाईन वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयामार्फत या प्रमाणपत्र शिबिराचा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी संधीचा लाभ घेऊन आपले नविन ऑनलाइन प्रमाणपत्र काढून घ्यावे असे आवाहन दिव्यांग नेते वैजनाथ जाधव यांनी केले आहे. तसेच ज्यांनी युनिक आयडी कार्ड काढले नसेल त्यांनीही या दिवशी आपले युनिक कार्ड काढून घ्यावेत. सोबत येताना ओरिजनल रेशन कार्ड, आधार कार्ड व दोन फोटो सोबत घेऊन सकाळी 9 ते 12 वाजेच्या वेळेत उपस्थित रहावे. असेही आवाहन दिव्यांग नेते वैजनाथ जाधव यांनी केले.




