राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता येथील डॉ के वाय गाडेकर माध्यमिक विद्यालयात स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण श्री. साईबाबा सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा राहाता नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष के वाय गाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी पतसंस्था चे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर, राहाता बौद्ध विहार चे भंते, सुवर्ण व्यापारी श्री. राहुल बोऱ्हाडे, श्रीकांत बोऱ्हाडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात गरीब विद्यार्थ्याना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वही आणि पेन वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दिलीप शिरसाठ, सौ. राहणे, अविनाश हजारे, सुनील पवार, वैभव कुलकर्णी, श्री. पवार, विजय त्रिभुवन,अशोक वाणी, पालकवर्ग, राहाता औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटप देखील करण्यात आले.




