कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):- १७ ऑगस्ट पासून श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या सभा मंडपात साई सच्चरित्र पारायण सोहळ्यास सुरुवात झाली.
गुरुवार दिनांक १७ ते २४ पर्यंत हा पारायण सोहळा पार पडणार आहे. श्री साई भगवती ग्रुप व कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थ यांच्यावतीने होत असलेल्या या पारायण सोहळ्यात सकाळी ६.३० वा. श्रींची काकड आरती सकाळी ७ ते ११ ग्रंथ वाचन व श्रींची आरती असे दैनंदिन कार्यक्रम संपूर्ण होणार आहे.
दिनांक २४ रोजी सकाळी ९ वा. ग्रंथ पालखी मिरवणूक आहे तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत साई कथाकार विकास महाराज गायकवाड यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाट पाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व गणेश महाराज मुसमाडे हे करत असून दैनंदिन पूजा सुनील कुलकर्णी हे करत आहेत पारायण सोहळ्याचे हे १५वे वर्ष असून या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त वाचक सहभागी झाले आहेत. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्निल निंबे, धनंजय दळे, श्रीकांत खर्डे, ऋषिकेश खांदे, सुखलाल खर्डे हे प्रयत्नशील आहे .