राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी आज शिर्डी येथील काकडी विमानतळा नजिक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे उपस्थितीत जिल्ह्यातून नागरिकाना कार्यक्रमास हजर राहण्यासाठी शासनाने गावोगावी एस टी बसची सोय केल्याने आज अचानक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीची मोठी गैरसोय होत असल्याचे तालुक्यात अनेक ठिकाणाहून शाळा महाविद्यालयासाठी येणाऱ्याचे प्रचंड हाल होत झाल्याने पाहून आमदार प्राजक्त तनपुरे हे एका कार्यक्रमासाठी वांबोरी येथे जाताना अनेक विद्यार्थी पायी चालले दिसल्याने त्यांनी त्याठिकाणी थांबून विद्यार्थिनीची विचारपूस करून स्वतःचे गाडीतून पोहच केले.
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तारीख उपलब्ध होत नसल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. मात्र आज शिर्डी येथील काकडी विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. मात्र या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरले जात असल्याचंही सांगण्यात आले.
प्राजक्त तनपुरे यांनी जनतेच्या सोयीसाठी ‘शासन आपल्या दारी हा उपक्रम’ शिंदे फडणवीस सरकारने सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा घेऊन सरकारच जनतेच्या दारी जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील काकडी गावात मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार ह्यांचे उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडत आहे. मात्र या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे राष्ट्र्वादी पक्षाचे राहुरी येथील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निदर्शनास आणून दिले. याचा एक आज राहुरी वांबोरी रोड वरील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
शासन आपल्या दारी’ या शासनाच्या उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले”,असा दावा प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. “सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत.वांबोरी येथील बस स्थानकानावर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी ची गर्दी पाहून भेट घेतली व चौकशी केली असता तासभरा पासून एकही एस टी आली नाही बाहेरून एस टी रिकाम्या जात असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी गाडी थांबून बघितली असता एका बस मध्ये फक्त १० ते १२ लाभार्थी दिसत होते. आमदार तनपुरे ह्यांनी बस रिकामी चालली तर ह्या विद्यार्थिना घेऊन जाण्यास भाग पाडले.
विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आज शिर्डीत होत आहे. त्यासाठी गावोगावच्या लोकांना आणण्यासाठी सकाळ पासूनच एसटी बस आरक्षित करून त्या बसेस रवाना करण्यात आल्याने ग्रामीण भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका बसने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून राहुरी तालुक्याचे आमदार व माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेले. बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या वाहनातून शाळेत सोडले.
यावेळी आमदार तनपुरे ह्यांचे समवेत बाबा भिटे, नितीन बाफना, किसनराव जवरे कृष्णा पटारे,प्रशांत नवले उपस्थित होते.




