8.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर मतदार संघातील पाटपाणी प्रश्नाच्या पाठपुराव्याला यश-आ. कानडे

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर मतदार संघातील पाटपाण्याच्या प्रश्नावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. कालवे व चाऱ्यांचे नुतनीकरण, वाटरगेज सयंत्र बसविणे याबाबत शासनाने दखल घेऊन संबंधीतांना सूचना केल्या असून ही कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

श्रीरामपूर  तालुक्याला भंडारदरा धरणाचे पाणी मिळते. निळवडेचे पाणीही उपलब्ध होते. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम झाल्याने मतदार संघातील पाणी कमी होईल, याची दखल घेऊन आ. कानडे यांनी मतदार संघातील सिंचनाचे पाणी कमी होणार नाही व शेतकरी अडचणीत येणार नाहीत, यासाठी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधान सचिव दीपक कपूर यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम झाल्याने आता श्रीरामपूर मतदार संघात पाणी मिळणार नाही. श्रीरामपूर तालुका भडारदरा लाभक्षेत्रातील शेवटचा (tail चा) तालुका आहे. कालवे शंभर वर्षापेक्षा अधिक जुने झाल्याने सिंचनाचे ५० टक्के पाणी वाया जाते, त्यासाठी तातडीने कालवे दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावेत, निळवंडेच्या पाण्यातून सर्व टेल टैंक, केटी वेअर्स व पाझर तलाव भरले जात होते. निळवंडे धरणाचे कालवे झाल्याने ओव्हर फ्लोचे पाणी देखील मिळणार नसल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ओव्हर फ्लोच्या पाण्यामधून टेलटैंक व केटी वेअर्स भरून देण्याची तरतूद करावी, श्रीरामपूर तालुक्यातील पाणी वाटपासाठी वाटरगेज संयंत्र बसवावेत तसेच कालवे व चा-यांचे नूतनीकरण करावे अशी विनंती आ. कानडे यांनी केली. सदरच्या पाठपुराव्याला यश आले असून आ. कानडे यांचे दि. ६ जुलै २०२३ चे पत्र पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिवांकडे पाठवून सचिवांनी २४ जुलै २०२३ रोजी याबाबतचे प्रस्ताव देण्याबाबत संबंधीतांना कळविले आहे.

दरम्यान आ. कानडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने कालवे नुतनीकरणासाठी मागील वर्षी १५ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली असून त्यास तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. लवकरच त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होणार आहे. गोदावरी पाटबंधारे विभागांतर्गत तालुक्यातील चारी क्र. १८, १९ व २० श इतर चाऱ्या दुरुस्तीबाबत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या कामासही लवकरच सुरुवात होणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

पावसाने ओढ दिल्याने मतदार संघातील पिके जळू लागली आहेत. या पिकांना धोका होऊ नये म्हणून आ. कानडे यांनी आठ ते दहा दिवसांपूर्वीच अधिकार्याशी संपर्क करून व लेखी पत्र देऊन धरणातून आवर्तन सोडून खरीप पिकांना द्क्ण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. दोन दिसांपुर्वीच ते श्रीरामपुरात पोहचले आहे. टेल टू हेड सर्व क्षेत्रासाठी पाणी देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या असून शेतकर्यांनीही खरीपाचे क्षेत्र आहे तेवढेच पाणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन आ. कानडे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!