श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा जिल्हा रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने
४ थी श्रीरामपूर रोलबॉल लीग स्पर्धा आयोजित होणार असल्याची माहिती रोल बॉलचे सचिव श्री प्रदीप पाटोळे यांनी दिली.ग्रामीण भागात रोलबॉल या खेळाचा प्रचार-प्रसार, व तळागाळातील विद्यार्थ्यांना हा नवीन खेळ अवगत व्हावा यासाठी ही रोलबॉल लीग आयोजित करण्यात आली आहे.२८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने दि २४ ऑगस्ट रोजी रोलबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे.सदर स्पर्धात ११ वर्षाखालील,१४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुला-मुलींच्या संघांना सहभागी नोंदवता येईल. विजेत्या संघांना स्पर्धेमध्ये आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आले आहे.उद्घाटन शाळेचे संस्थेचे चेअरमन श्री राम टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड ,श्रीराम अकॅडमीच्या प्राचार्या सौ जयश्री पोडघन,श्री गोकुळ खंडागळे,श्री नितीन बलराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. संघांनी आपल्या संघाची नोंदणी २३ ऑगस्ट पूर्वी श्री नितीन गायधने(7498059025) व नितीन बलराज(7972689643) यांच्याशी संपर्क साधून करावे.




