श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-टाकळीभान गावातील बेलपिंपळगाव रस्त्यावरील कोंबडवाडी परिसरात असलेली महावितरणची डीपी गेल्या महिन्यापासून वारंवार जळत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना, घरगुती वीज ग्राहकांना आणि ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदर डीपी साठी तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकसेवा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात येत असल्याचे बाजार समितीचे संचालक मयुर पटारे यांनी सांगितले आहे.
त्यासंदर्भात भोकर सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता मुळे आणि वायरमन कैलास घोळवे यांना नवीन डीपी द्यावी याकरिता निवेदन देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.निवेदनावर कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, संत सावताचे संचालक विलास दाभाडे, कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, माजी उपसरपंच भारत भवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील बोडखे, प्रकाश दाभाडे, गोटिराम दाभाडे, शिवाजी पवार, गोरख दाभाडे, शिवाजी पटारे, अशोक रोटे आदींच्या सह्या आहेत.




