राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ): – राज्या मध्ये दररोज पत्रकारांवर हल्ले होत आहे हे हल्ले रोखण्यासाठी पत्रकार यांचे वरील होणाऱ्या हल्ल्या साठी कायदा आणखी कठोर करावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
काल काकडी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये सदरील निवेदन देण्यात आले यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा मार्फत होत असलेल्या कामाची श्री जितेंद्र जाधव यांचे कडे विचारपूस केली तसेच वैद्यकीय मदत कक्षा मार्फत होत असलेल्या मदतीचे कौतुक केले तसेच सदरील योजना समाजातील शेवटच्या घटकामार्फत तत्काळ कश्या पोहचवता येतील याबाबत मार्गदर्शन केले तसेच श्री जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अजून काही रुग्णालये सदरील योजनेमधे समाविष्ट करावे.
म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली यावेळी खासदार सदाशिव लोखंडे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख श्री जितेंद्र जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते ,शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर ,शिवसेना संपर्कप्रमुख श्री सचिन जाधव, शिवसेना संपर्कप्र मुख बाजीराव दराडे , श्री अनिल शिंदे,श्री बाबूशेठ टायर वाले , देवेंद्र लांबे आदि उपस्थित होते




