श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर येथील रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मा.मीनाताई जगधने यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून विविध स्वरुपाचे उपक्रम राबविले जातात. यामाध्यमातूनच गुरुवार दि. १०/०८/२०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता महाविद्या लयाच्या आय. टी. विभागात टॅली कोर्स उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उदघाटन सी. डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण बडधे, टॅली कोर्स चे मार्गदर्शक श्री. दिनेश चोरडिया, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनिल चोळके, ज्युनि. कॉलेजच्या उपप्राचार्या सौ. सुजाता पोखरकर, पर्यवेक्षक प्रा. कुंडलिक सानप, प्रा. आण्णासाहेब गोराणे उपास्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टॅली कोर्स चे समन्वयक प्रा. जलाल पटेल यांनी केले. यात त्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना या कोर्सच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी टॅली कोर्सला चांगला भविष्यकाळ आहे तसेच आजच्या आधुनिक युगात अकाउंट चे चांगले काम या माध्यमातून करता येते असे ही त्यांनी स्पष्ट केले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टॅली कोर्स आता सोपा झाला आहे. प्रत्येक व्यवसायाचा टॅली कोर्स आज अविभाज्य भाग झाला आहे हे नमुद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण बडधे यांनी विदयार्थ्यांना टॅली कोर्सचा उपयोग तुम्हांला आयुष्यात फायदेशीर ठरणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० या वर्षापासून लागू होत आहे,तसेच महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे. याशिवाय महाविद्यालयात पोलीस भरती प्रशिक्षण कोर्स, नीट / जेईई/सीईटी या स्पर्धा परीक्षांसाठी चांगल्या नोट्स उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व रयत शैक्षणिक संकुल, श्रीरामपूर च्या चेअरमन मा. मीनाताई जगधने यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार सौ. सुजाता पोखरकर यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक वृंद व टॅली कोर्स साठी सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



