श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ आली आहे या आजाराने अनेक रुग्ण ग्रासले आहेत या पासोशल वर्क ग्रुपचे काम आदर्शवत- आ. कानडे पार्श्वभूमीवर युनिटी आय हॉस्पिटल व सोशल वर्क ग्रुपने नागरिकांसाठी शिबीर आयोजित करून सेवाधर्म जोपासला असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले
स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील वार्ड नं 2 मधील कुरेशी जमातखाना येथे युनिटी आय हॉस्पिटल व सोशल वर्क ग्रुपने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराचे उद्घाटनप्रसंगी आमदार कानडे बोलत होते यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अंजुम शेख, कलीम कुरेशी, निसार कुरेशी, फयाज कुरेशी, जाकीर शाह, सलीम शाह, जमिर पिंजारी, भैय्या शहा, फयाज बागवान आदी उपस्थित होते
शिबिरात नेत्र रोग तज्ञ डॉ नीलम अग्रवाल व मेहेरबान सिंग यांनी रुग्णांची तपासणी केली डोळे न येण्यासाठी घ्यावयाची काळजी, डोळे आल्यानंतरचे उपचार तसेच डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती डॉक्टरांनी दिली यावेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली डोळे न येण्यासाठी व आल्यानंतर जळजळ थांबविण्यासाठी असलेल्या औषधांचेही यावेळी वाटप करण्यात आले
आमदार कानडे यांच्या डोळ्यात ड्रॉप टाकून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मान्यवरांचा सोशल वर्क ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला ग्रुपचे फय्याज कुरेशी यांनी प्रास्ताविक केले निसार कुरेशी यांनी आभार मानले.



