वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- २१ ऑगस्ट पासुन सुरु होत असलेल्या सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता संपुर्ण शहरातुन संकट मोचन हनुमान मंदिरापासून गाथा मिरवणुक काढण्यात येणार आहे.
गोदाधाम(सरला बेट)चे सदगुरू गंगागिरी महाराज यांनी १८४७ मध्ये आरंभ केलेला अखंड हरिनाम सप्ताह आजवर अखंडपणे चालू आहे. यावर्षी १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर शहरात मुंबई-नागपूर महामार्ग पोंदे पेट्रोल पंपाजवळ भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याची अंतिम तयारी पूर्ण झालेली आहे. सप्ताह पार पाडण्यासाठी २१ जणांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली असून विविध ३६ समित्या आहेत. २१ ते २८ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अखंड हरीनाम सप्ताहाचा आरंभ सोमवारी (२१ऑगस्ट) येथील श्री संकट मोचन हनुमान मंदिर पासून सकाळी दहा वाजता गाथा मिरवणूक, मठाधिपती हभप रामगिरीजी महाराज यांची रथ मिरवणूक, लेझीम, ढोल, कलशधारी महिला, टाळकरी, भजनी मंडळी व शहरातील सर्व बँड व समस्त गावकरी व तालुक्यातील भक्त भाविक यांच्यासह निघणार आहे व सप्ताह स्थळी बारा वाजे दरम्यान पोहचून सप्ताहाला आरंभ होईल. या सप्ताहाच्या प्रहारा साठी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे.तसेच कुटीया ,भोजन कक्ष असे वेगवेगळे भव्य मंडप उभारण्यात आले आहे.तसेच भव्य असे प्रवेश द्वार उभारण्यात आले आहे. दररोज भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामगिरी महाराज यांनी केले आहे.



 
                                    
