लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,लोकप्रिय खासदार डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलासनाना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ . विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादन वाढ योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त डॉ संजीव माने यांचे आज प्रवरा परिसरातील बऱ्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस प्लॉट वर भेटी दिल्या.
त्यांनी त्या त्या ठिकाणी स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषीभूषण माने म्हणाले की खतांची योग्य मात्रा, अमृत कलश किट आणि विखे पाटील कारखान्याचे तेजस खत वापरले तर नक्कीच आपण १००+, १५०+ टन ऊसाचे उत्पादन शक्य आहे.
विखे पाटील कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी घनश्याम कोळसे व केन मॅनेजर संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, रवींद्र संपतराव कडू सात्रळ, ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी हसनापुर, अनिल अंत्रे सोनगाव,प्राणीमित्र विकास म्हस्के लोणी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर कृषीभूषण माने यांनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रविणभाऊ विखे पाटील, डॉ . एन.एस.म्हस्केपाटील,गट नंबर ४चे गटप्रमुख रघुनाथ मगर, गट २चे प्रमुख कटारे नकुल, पी. आर. शेळके, चतुरे , शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.



