श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):- गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावून डॉ .बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महान कार्य केले पो.उप. समाधान सुरवाडे श्रीरामपूर विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा १७ व्या वर्धापन दिन तसेच १५ ऑगस्ट ७६ वा स्वातंत्र दिनानिमित्त कोरोना मध्ये मृत पावलेल्या पालकांच्या मुला मुलींना प्रत्येकी १ बॅग १कंपास ६ स्क्वेअर बुक ६ वह्या मोफत देऊन गोड अल्प आहार देण्यात आला शुक्रवार दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता संगमनेर रोड येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे सामाजिक कार्यकर्ते के के आव्हाड, बाबाजी गांगड,कामगार तलाठी राजेंद्र घोरपडे, मिशन वात्सालय सदस्य बाळासाहेब जपे होते त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे म्हणाले की विद्यार्थ्यांनो तुमच्या आई वडिलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिक्षण हे घेतलेच पाहिजे कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुला मुलींना शिक्षणासाठी शालेय उपयोगी वस्तू देऊन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महान कार्य केले त्यांच्या कार्याला तोड नाही असेही सुरवाडे म्हणाले सामाजिक कार्यकर्ते के के आव्हाड म्हणाले आपले पोट भरून उरलेले जो देतो ते दान नाही तर आपल्या भाकरीतला अर्धा तुकडा जो दान करतो ते खरे महान दान होय असे निस्वार्थी काम संस्थेचे चालू आहे आव्हाड म्हणाले विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की गेली १७ वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, दुर्धर आजाराने ग्रस्त लाभार्थी, झोपडपट्टी (सेवा वस्ती) मधील गरजू लाभार्थी, समाजातील पीडित व गरीब व गरजू लाभार्थ्यां साठी संस्थेच्या माध्यमातून अहोरात्र कार्य सुरू आहे.
झोपडपट्टी (सेवावस्ती) येथील विद्यार्थी ज्यांच्या पालकांची आर्थिक परिस्स्थिती हलकीची आहे त्यांना शालेय साहित्य वाटणे, समाजातील ज्येष्ठ नागरिक,अपंग लाभार्थी, विधवा महिला ,परितक्ता महिला यांना शासकीय योजनेचा लाभ मिळून देणे,कोरोना काळा मध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये जाऊन विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व ग्रामीण रुग्णालय,नगरपरिषद, उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक भागामध्ये जाऊन सगळ्या लाभार्थी यांचे लसीकरण करून घेण्यात आले. व त्या लाभार्थी यांना समुपदेशन करण्यात आले.तर जेव्हड्या लोकांचे लसीकरण केले व समुपदेशन केले त्या कुणालाच कोरोनाची लागण झाली नाही हि संस्थेच्या कामाची पावती आहे. दुर्बल आर्थिक परिस्थिती असलेल्या आजारी लोकांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार दिले केले तसेच कोरोना काळामध्ये गरीब १५०० लोकांना किराणा किटचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेले वैभव लोढा, श्रीनिवास बिहानी,सोमनाथ कोकरे,बाबा गांगड, सर्जेराव मुंडे आदींनी विशेष सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव लक्ष्मण पडवळ सदस्य अर्जुन शेजवळ निलेश कोळगे संदीप धिवर तसेच संघराज त्रिभुवन बाळासाहेब जपे पो. कॉन्स्टेबल लक्ष्मण सांगळे व अनिल बोरुडे रवींद्र शिंदे शालन ससाने भूमिका बागुल मयुरी परदेशी ईशांत भाकरे प्रेम कुऱ्हे समीक्षा हुमेश सय्यद असलान सय्यद मशीरा शेख आरहान शेख रोहित राऊत श्रावणी महाडिक आराध्या महाडिक राखी शिंदे स्वरा मते सानिका नाटकर गार्गी गायकवाड आदेश बागुल फरहान शहा आदी उपस्थित होते



