लोणी दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशन कडून पाथर्डी येथे घेण्यात आलेल्या सीनियर तायक्वांदो स्पर्धेत प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये कार्यरत असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षक प्रतीक्षा रावसाहेब देवरे आणि प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रात शिकत असलेली सोनाली अनिल खोबरे या दोघींनी पहिला क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे म्हणाले,मैदानी खेळांबरोबरच जलतरण अशा विविध क्रिडा स्पर्धेतून प्रवरेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन होत आहे.यासाठी प्रशिक्षक प्रा.दिनेश राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा.डाॅ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालक शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, प्राचार्या डॉ. रोजमिन बेलीन क्रिडा शिक्षक रवींद्र भणगे व किरण कडस्कर यांनी अभिनंदन केले.



