spot_img
spot_img

महावितरण कंपनीने शेतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा: भारत राष्ट्र समितीचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे यांची मागणी

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – पावसाअभावी ऊसासह खरीपाची पिके सुकून चालली असून शेतकरी विहीर अथवा बोअरवेलचे पाणी देत आहेत. तथापि, वीज पुरवठा खंडीत व पुरेशा दाबाने होत नसल्याने विद्युत पंप जळत आहेत. यामुळे विहीरींना पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. वीज वितरण विभागाने भोकर, बेलापूर, मातापूर या सबस्टेशनची तात्काळ दुरुस्ती करावी आणि शेतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा. याबाबत कार्यवाही न झाल्यास माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारत राष्ट्र समितीचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे यांनी दिला आहे.

महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संतोषकुमार भंगाळे यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, गणेश छल्लारे, शिवाजीराव मुठे आदींची भाषणे झाली. निवेदन देतेवेळी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, बाबासाहेब आदिक, जितेंद्र तोरणे, हरिदास वेताळ, दशरथ पिसे, भाऊसाहेब हळनोर, योगेश विटनोर, प्रफुल्ल दांगट, अच्युतराव बडाख, नारायणराव बडाख, राजेंद्र लांडगे, प्रविण फरगडे, भैरव कांगुणे, अमर ढोकचौळे, गणेश भाकरे, अमोल ढोकचौळे, रंगराव रंजाळे, आशिष दोंड, भाऊसाहेब दोंड आदींसह शेतकरी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!