वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कर्ज फेडण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिल्याची घटना तालुक्यातील पाथरी येथे घडली.या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील संतोष एकनाथ कुभांडे यांची मुलगी तनुजा (२३) हिचे लग्न २०२० साली तालुक्यातीलच पाथरी येथील संदीप भगवान आधुडे याच्याशी झाले होते.लग्नानंतर तिन ते चार महिन्यांनी माहेराहून चार लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी घेऊन ये.अशी मागणी सासरच्या मंडळींनी केली.त्यांची पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण व शिवीगाळ करून तिचा छळ करण्यात आला.तसेच तुला बंदुकीने उडुन देवू अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.तसेच तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले.या प्रकरणी तनुजा हिने दिलेल्या फिर्यादीवरून संदीप भगवान आधुडे, भगवान नामदेव आधुडे,मिना भगवान आधुडे, समाधान भगवान आधुडे सुनिल हरिभाऊ शिलोटे, दादासाहेब शिलोटे, शांताबाई सुदामराव कुभांडे या सात जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार किरण गोरे हे करीत आहेत.



