नेवासे ( जनता आवाज वृत्तसेवा ):- समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांच्या सेवेसाठी मोफत आरोग्य शिबिर हे काळाची गरज असून या शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणारा दिलासा हेच आपले आत्मिक समाधान आहे. विविध माध्यमातून नेवासे शहर व तालुक्यात जनसेवेचा यज्ञ अखंडितपणे चालूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
आमदार शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून नेवासे येथे आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती सभापती नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते रामभाऊ जगताप, रम्हूशेठ पठाण, अंकुश महाराज जगताप, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, संजय सुखदान, रणजीत सोनवणे, संदीप बेहेळे, दिनेश व्यवहारे, राजेंद्र मापारी, सचिन नागपुरे, फारुख आतार, इम्रान दारूवाले, आसिफ पठाण, ॲड. सतीश पालवे, हिरामण धोत्रे, लक्ष्मीनारायण जोंधळे महाराज, नारायण लोखंडे, सरपंच दादा निपुंगे, राजेंद्र चौधरी, निलेश जोशी, सागर देशपांडे, उपप्राचार्य दशरथ आयनर, निलेश पाटील, रहेमान पिंजारी संजय थोरात, शेतकरी नेते पी. आर. जाधव, सुनील धायजे, अभय गुगळे, युसूफ बागवान, प्रकाश सोनटक्के, विनायक नळकांडे, गणेश कोरेकर, पिंटू परदेशी मच्छिंद्र कडू, कारभारी परदेशी आदी उपस्थित होते.
आमदार गडाख म्हणाले, डोळा हा मनुष्याचा अत्यंत नाजूक असा अवयव असून त्यावर उपचार करणे हे अत्यंत खर्चिक व कठीण असते. त्यामुळे सर्वसामान्य वंचितांची सेवा म्हणून या शिबिराच्या माध्यमातून उपचार करण्याचा आपला असा छोटासा प्रयत्न सर्वांच्या सहकार्यातून करत आहे. समाजातील अनेक वृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचे किती छोटे मोठे प्रश्न असतात हे आपल्या लक्षात येत नसते तसेच उपचार खर्चिक असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपण नेवासे तालुक्यातील वृद्ध, ज्येष्ठ व वंचितांची सेवा म्हणून सर्वांच्या सहकार्याने विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा आपला प्रयत्न राहील. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अमृत फिरोदिया, ज्ञानेश्वर’चे संचालक काकासाहेब शिंदे, बुधराणी हॉस्पिटलच्या डॉ. मनीषा कोरडे यांची भाषणे झाली.
प्रस्ताविक ॲड. काकासाहेब गायके यांनी केले. दैनंदिन कार्यक्रमांत व्यस्त असल्याने भ्रमणध्वनीद्वारे ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त हभप गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख, श्रीराम आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज, मौलाना मुफ्ती अब्दुलरहीम शहा, फादर दिलीप जाधव यांनी आमदार शंकरराव गडाख यांचे संकल्पनेतून होणाऱ्या या आरोग्य शिबिराचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे यांनी आभार मानले.
आ. गडाखांकडून ही उपेक्षितांची सेवा : गुरुवर्य उद्धव महाराज ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून समाजातील वंचित, दुर्लक्षित व उपेक्षित घटकांची सेवा मोफत आरोग्य शिबिराचे माध्यमातून आमदार शंकरराव गडाख हे करत आहेत. मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजाची मोठी सेवा घडत असते. तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आमदार गडाख यांनी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन नेवासे येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ आयोजित केलेल्या नेवासे येथील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास नेवासेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिबिरात एकूण ४२४ नेत्र रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या पैकी १२५ नेत्र रुग्णांचे रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर पुणे येथील बुधरानी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.रुग्णांच्या तपासण्या बुधरानी हॉस्पिटलच्या डॉ. मनीषा कोरडे व डॉ. मीरा पटारे यांनी केल्या त्यांना नेवासे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱयांच्या सहकार्य लाभले.



