spot_img
spot_img

देशी गायींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आयोगाची मदत होईल -ना.विखे आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा सत्कार संपन्न

श्रीरामपूर दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी वंश जातीच्या गायींचे संरक्षण आणि संवर्धनाचे काम पुढे घेवून जाण्यास मोठी मदत होईल असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पदावर नगर जिल्ह्याचे सुपूत्र शेखर मुंदडा यांची निवड झाल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.माहेश्वरी समाज डॉक्टर असोसिएशन आणि अन्य संघटनांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.ह.भ.प.अक्षय महाराज भोसले आचार्य महेशजी व्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे संघटन सरचिटणीस नितीन गडकरी नंदूशेठ राठी नानासाहेब पवार गणेश राठी प्रकाश राठी डॉ रविंद्र कुटे डॉ के.डी.मुंदडा यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

शेखर मुंदडा यांच्या सारख्या कार्यकर्त्याला आयोगाचा पहीला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब असून हा आयोग स्थापन करण्याचे भाग्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन मंत्री म्हणून मला मिळाले याचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, आयोगाच्या माध्यमातून गोमातेची सेवा करण्याची मोठी संधी आहे.राज्यात अनेक चांगल्या गोशाळा काम करीत आहे.गोमाता सभाळणे एवढे सोपे नाही परंतू अनेकांनी आव्हानांवर मात करून सुरू ठेवलेली गोमातेची सेवा ही एक प्रकारे लक्ष्मीची पूजा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात अनेक वर्षे गोसेवा आयोग स्थापन होवू शकला नव्हता. याबाबत मत मतमतांतरे होती.परंतू देशी वंश जातीच्या गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात पंतप्रधान मोदी यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय आयोगा प्रमाणे राज्यातही आयोग काम करेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार दूध उत्पादक शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यानेच दूधाला ३४ रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये काही संघाकडून दूध उत्पादकांची फसवणूक केली जात असून यांची दखल विभागाने घेतली आहे.शेतकर्यांना कमी दर देणार्या दूध संघाबाबत सरकारने गांभीर्य घेतले असून आशा संघाना अचानक भेटी देण्याच्या सूचना अधिकार्याना दिल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

शेखर मुंदडा यांनी अध्यक्ष पदाची मिळालेली संधी गोमातेची सेवा करण्यासाठी असल्याचे सांगून आजपर्यत एक हजार गायींना जीवनदान दिले आहे.आता कसायाकडे गाय न देता आमच्या गोशाळेत द्या असे आवाहन करून.भविष्यात गोशाळेच्या माध्यमातून रोजगाराची संधी कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंदडा म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!