टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):– चोरी होवून सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला पण अद्याप पर्यंत पोलिसांनी चोरीचा तपाल लावला नसल्याने चोरीचा तपास लावावा या मागणीसाठी सोमवार दिनांक २१ आॅगस्ट रोजी टाकळीभान पोलिस स्टेशन समोर श्रीमती बेबी मधुकर गाडेकर या उपोषण सुरू करणार आहेत. पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात श्रीमती गाडेकर यांनी नमुद केले आहे की,
दिनांक १५/२/२०२३ रोजीटाकळीभान येथे रात्रीच्या दरम्यान नेवासा श्रीरामपूर मार्ग लगत माझ्या राहत्या निवासस्थानी काही आज्ञात इसमानी घर फोडून, कुलूप तोडून घरातील १ लाख ५० हजार एवढी रोख रक्कम व ८ तोळे सोने एवढा मुद्देमाल चोरी केला आहे या घटनेबाबत श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या
कडे गुन्हा दाखल केला असून गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२३ भा.द.वि.क ४५७/३८० प्रमाणे दाखल आहे तरी या घटनेचा आपल्या पोलिस अधिकारी यांनी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची तपासाची कारवाई न केल्यामुळे मी दिनांक २१/८/२०२३ रोजी उपोषणास बसणार आहे.
याबाबत मी १०/३ /२०२३ रोजी पोलीस स्टेशन समोर टाकळीभान या ठिकाणी संविधानिक मार्गाने उपोषण करणेकामी बसले होते सदर उपोषण ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक चौधरी यांनी व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बोरसे यांनी उपोषण ठिकाणी येऊन मला पंधरा दिवसापर्यंत गुन्हेचा तपास लावतो असे लेखी आश्वासन देऊन उपोषणाला स्थगिती घेण्यात आली होती मात्र चोरी होवून सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून देखील कुठल्याही प्रकारची तपास कार्यवाही केलेली दिसून आलेली नाही.
श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वारंवार विचारणा केली असता तपास अधिकारी हे माझ्याशी अरेरावी भाषा करत व मला एवढेच काम आहे का असे उच्च आवाजात माझ्याशी गैरवर्तन करत आहे.
तरी या घटनेमुळे माझ्या कुटुंबाची मानसिक संतुलन बिघडलेले असून माझ्या गरीबाची या घटनेत खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली आहे व आरोपी मात्र मोकाट सुटलेले आहे. सदर घटनेचा मागील कालावधी लक्षात घेता तातडीने कार्यवाही करावी व लवकरात लवकर तपास पूर्ण करुन आरोपींना शिक्षा मिळावी व महाराष्ट्राच्या जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कायम राहावा व मला न्याय मिळावा म्हणून मी दिनांक २१/८/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता टाकळीभान पोलीस स्टेशन समोर महापुरूषांच्या प्रतिमेच्या साक्षीने संविधानिक मार्गाने उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनाच्या प्रती अप्पर पोलीस अधीक्षक,महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस उपाधिक्षक, श्रीरामपूर, पोलीस स्टेशन श्रीरामपूर ठाणे अंमलदार,जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देण्यात आल्या आहेत.



