spot_img
spot_img

धामोरी खुर्द. कृषीदुतांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):-डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय विळद घाट येथे हे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी धामोरी खुर्द येथील शेतकऱ्यांशी सवांद साधला.

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले. हे कृषिदूत ग्रामीण जागरुकता आणि कृषीऔद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी येथे आले. कार्यक्रम समन्वय प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत मोटे रामचंद्र, काळे सुरज, मगर ऋषिकेश, कदम सचिन, काळे जीशांत हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे कृषीदूत पुढील दहा आठवड्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे अनुभव जाणून गावकऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतातील माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेतातील अवजारांचा वापर, शेतीतील आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांची संवाद साधण्यात आला. या उपक्रमातून आधुनिक शेतीला नवी दिशा मिळेल तसेच, वेळोवेळी विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करून आधुनिक शेती तंत्रज्ञानविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहेत. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. बी. धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. राऊत, प्रा. भोसले, कार्यक्रम समन्वयक प्रा. के. एस. दांगडे, प्रा. एच एल शिरसाठ, प्रा. ठोंबरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ग्रामसेवक एम एस वाघ आणि त्यांचे सहकारी किशोर ससाणे  उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!