श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- केंद्रातील भाजप सरकारने कांदा निर्यातीवर ४० % शुल्क लादून शेतकरी बांधवांवर मोठा अन्याय केला असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस व श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या प्रसंगी ससाणे बोलत होते. देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर ४०% शुल्क लादले आहे. शहरी भागातील कांद्याच्या किरकोळ दरात वाढ होताच कांद्याच्या दरावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राने ही पावले उचलली आहेत. त्यामुळे कांदा निर्यातीवर शुल्क आकारणीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
ससाणे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी अनेक नैसर्गिक अडथळे पार करून कांद्याची लागवड केली. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने कांद्याचे अतोनात नुकसान झाले. कांदा काढणीच्या काळातही अवकाळी पावसाने कांदा सडला. अशा नैसर्गिक आपत्तीतही शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी वारे माप खर्च करून चांगला कांदा चाळीत भरला. आता कुठे कांद्याच्या भावात सुधारणा होत असतानाच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्कात वाढ करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गही हतबल झाला आहे. यानंतर साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले की, कांद्याच्या निर्यातीवर ४०% निर्यात शुल्क आकारल्याने कांद्याच्या भावात घसरण होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाली
कांद्याच्या निर्यातीवर ४०% निर्यात शुल्क आकारल्याने कांद्याच्या भावात घसरण होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यानंतर जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे म्हणाले की, भाजप सरकारने शेतकरी विरोधात निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली असून भविष्यात भाजप सरकारला याची किंमत चुकवावी लागेल. यानंतर श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की भाजप सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भाजप विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण यांनी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका करत आपला निषेध नोंदवला. यावेळी मा.नायब तहसीलदार हेमलता वाकडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
त्यामुळे कांद्यावरील ४०% निर्यात शुल्क केंद्र शासनाने तात्काळ रद्द करून शेतकरी बांधवांना न्याय मिळावा अशी मागणी निषेध मोर्चात सहभागी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याप्रसंगी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजेंद्र पाऊलबुद्धे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावखर, मा नगरसेवक दिलीप नागरे, के सी शेळके, रितेश रोटे, रमजान शहा,मुन्नाभाई पठाण,राजेंद्र सोनवणे,प्रवीण नवले, सुरेश ठुबे, अशोक जगधने, युनुस पटेल, रितेश एडके, रियाज खान पठाण, निलेश बोरावके, सुनील साबळे, नजीर भाई शेख,बुऱ्हाणभाई जमादार, सनी मंडलिक, युवराज फंड,रितेश चव्हाणके, शाहेबाज पटेल, योगेश गायकवाड,दिलावर शेख,लक्ष्मण शिंदे, गोपाल भोसले, वैभव कुऱ्हे, अशोक दुग्गल, अजय धाकतोडे, मुनीर पठाण, दिपक कदम, सागर भांड, राजेश जोंधळे, प्रताप गुजर, आकाश जावळे, अनिल लबडे, विजय साखरे,संजय गोसावी, कल्पेश पाटणी, जियान पठाण, प्रशांत आल्हाट, सागर दुपाटी, प्रणव शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



