श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- केन्द्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सदरचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा शेतकरी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन छेडतील, असा इशारा भारत राष्ट्र समिती व लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच २२ ऑगस्ट २०२३ पासून कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांनी पुढील निर्णय होईपर्यंत कांदा मार्केट कमिटीत विक्रीसाठी आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
केन्द्र शासनाने अचानक अध्यादेश काढून कांदा निर्यातीवर ४० % शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा निर्यात बंद झाली असून कांद्याचे भाव प्रति क्विंटल हजार रुपये पर्यंत कमी झाले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत कांद्याला चांगले भाव मिळू लागल्याने शेतकरी सुखावला होता. पण केन्द्र शासनाने निर्यात शुल्क आकारणीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. महागाई दरवेळी नेमकी शेतमालाच्या मुळावरच कशी येते याबाबत संतप्त भावना निर्माण झाली आहे. महागाई कमी करायची तर पेट्रोल, डिझेल, गॕसच्या किंमती कमी कराव्यात, पण शेतकऱ्यांवर अन्याय करु नये. अन्यथा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सदर आंदोलनास बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी संचालक मंडळाच्या वतीने पाठींबा दिला. तसेच २२ ऑगस्ट पासून कांदा विक्री लिलाव बंद राहतील तेव्हा शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन केले. यावेळी विरेश गलांडे, मयुर पटारे, काशिनाथ गोराणे, दशरथ पिसे, गणेश छल्लारे, लहानू शेजुळ, महेश पटारे, राजेंद्र चक्रनारायण आदींची भाषणे झाली.
श्रीरामपुरातील नवीन प्रशासकीय इमारती समोर निषेध आंदोलन करुन प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारत राष्ट्र समितीचे कोंडीराम उंडे, हिम्मतराव धुमाळ, पुंजाहरी शिंदे, नाना पाटील, भाऊसाहेब हळनोर, दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब उंडे, भाऊसाहेब कहांडळ, विरेश गलांडे, ज्ञानदेव साळुंके, मयुर पटारे, यशवंत रणनवरे, दशरथ पिसे, सोन्याबापू शिंदे, किशोर बनसोडे, बाबासाहेब आदिक, जितेंद्र तोरणे, राम पटारे, युवराज थोरात, नितीन थोरात, रवींद्र जगधने, निवृत्ती थोरात, आदिनाथ जगधने, सतीश थोरात, अमोल कोलते, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, संजय लबडे, भगवान सोनवणे, प्रकाश नवले, प्रविण फरगडे, द्वारकानाथ नवले, बबनराव आसने, संतोष क्षत्रिय, रंगराव रंजाळे, अनिल फोपसे, कैलास चव्हाण, संदीप डावखर, विशाल धनवटे, पंढरीनाथ मते, बाळासाहेब लबडे, आशिष दोंड, भाऊसाहेब दोंड, सुनील बोडखे, शिवाजीराव मुठे, ज्ञानेश्वर मुठे, राजेंद्र देवकर, ज्ञानेश्वर नांगळ, मल्हारी मुठे, भाऊसाहेब दोंड, भास्करराव बंगाळ, प्रविण गवारे, भाऊसाहेब बनसोडे, दिपक झुराळे, अनिल फोपसे, रमेश वारुळे, अरुण भराडी, ज्ञानेश्वर गायकवाड, भगवान भांड, आबासाहेब वेताळ, हरिभाऊ बडाख, शिवाजी शिंदे, किरण बडाख, भैरव कांगुणे, सुरेश जगधने, राजेंद्र लांडगे, अच्युतराव बडाख, नारायण बडाख, बाबासाहेब मोरगे, रमेश सोनवणे, विलास गोराणे, उद्धव आहेर, शिवनाथ आव्हाड, जब्बार पठाण, इम्रान शेख, पंकज देवकर, शिवाजी सिनारे, मल्हारी मुठे, उत्तमराव डांगे आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



