श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- तालूक्यातील रस्त्यांची यापूर्वी रया गेली होती. योग्य नियोजन व पाठपुरावा केल्याने सुमारे ९५ टक्के रस्त्यांची कामे झाली आहेत. उर्वरित रस्तेही मार्गी लागतील. कामे केवळ मंजूर न करता ती दर्जेदार झाली पाहिजेत, याकडे आपण विशेष लक्ष दिले, पाटपाणी, वीज, या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन ती सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यात विकासगंगा सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
तालुक्यातील माळवाडगाव येथे बैठक घेऊन आमदार कानडे यांनी लोकसंवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, डॉ. नितीन आसने यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले कि, सरकार बदलल्याने कामे करण्यात अडचणी आल्या. तरीदेखील आपण आमदार निधी, जिल्हा नियोजन तसेच २५/१५, ५०/५४ अशा विविध मार्गाने निधी उपलब्ध केला. चालू बजेट, पुरवणी बजेट यात कोट्यावधी रुपयांची तरतूद केली. भविष्यात उर्वरित कामेही मार्गी लागतील, माळवाडगाव ते कामालपूर रस्ता तात्पुरता दुरुस्तीसाठी घेतला आहे, नंतर त्याचे डांबरीकरण करू.
यावेळी ग्रामस्थांनी कांदा, पाणी, रस्ते, वीज, रमाई आंबेडकर योजना, रेशन कार्ड, बुद्धविहार, गटारी, घरकुल, विज रोहित्रे यासह विविध प्रशन मांडले. पाटपाण्याबाबत चार्यांची दुरुस्ती करावी, कालव्यातील पाण्याचा वेग वाढवावा, वरच्या भागातील पाणी उचलेगिरी, एन. बी. चारीला पाणी सोडावे, अशी मागणी केली असता, आ. कानडे यांनी कार्यकारी अभियंता काळे व उप अभियंता कल्हापुरे यांचेशी दूरध्वनीवर संपर्क करून आवश्यक त्या सूचना दिल्या. घोगरगाव-घुमनदेव येथील नवीन वीज उप केंद्रामुळे या भागातील विजेचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल, असे आ. कानडे म्हणाले. माळवाडगाव ते कामालपूर, माळवाडगाव भामाठण शिव रस्ता, खानापूर रस्ता, खळवाडी (मोरे लिंब) येथील गटार व घरकुल कामे आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. हे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आ. कानडे म्हणाले.
यावेळी उत्तम रायभान आसने, भाऊसाहेब आनंदा आसने, पाराजी दळे, दिगंबर आढाव, प्रमोद आसने, राजेंद्र आसने, अशोक आसने, सुनील शेळके, शरद आसने, अरुण आसने, संदीप आसने, पांडुरंग वेताळ, पत्रकार भाऊसाहेब काळे, भिकाजी आसने, श्री. साळवे, आबासाहेब रमेश आसने, आकाश आसने, बाळासाहेब आसने, नितीन खाजेकर, सुधीर शेळके, तानाजी खताळ, नानासाहेब थोरात, अशोक भोंडगे, नरेंद्र आसने, श्रीकांत दळे, उद्धव शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब हुरुळे यांनी आभार मानले.