राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शौचालय व केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या तळागाळातील सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले काम कार्यकर्त्यांच्या विविध अडचणी त्याबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी नियोजनबध्द कामाची आखणी करणे याबाबत थेट शेवटच्या फळीतील कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी मतदार संघात खा सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत शिवेसेनेची संघटनात्मक बांधणी व कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट शिवसेना पक्षाचे निरीक्षक प्रंशात काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत
या प्रसंगी जिल्हा प्रमुख कमलाकर कोते राजेंद्र देवकर संपर्क प्रमुख बाजीराव दराडे बाळासाहेब पवार आदीसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बुधवारी दिनांक २३रोजी राहुरी नेवासा श्रीरामपूर व२४ ऑगस्ट रोजी राहता शिर्डी सकाळी ९वाजता व्हि आय पी गेस्ट हाऊस शिर्डी, १वाजता कोपरगाव, सायंकाळी ५वाजता संगमनेर तर २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९वाजता अकोले येथे होणार असून या बैठकीला शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख. कावेरी नवले विमलताई पुंडे युवा सेनेचे प्रमुख शुभम वाघ महेश देशमुख जिल्हा संघटक विजय काळे विठ्ठल घोरपडे यांनी केले आहे