22 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहूरी खुर्दची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निसारभाई शेख  सदस्यपदी पत्रकार अशोक मंडलिक व पत्रकार रमेश खेमनर यांची निवड 

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा) : – राहूरी तालुक्यातील राहूरी खुर्द येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाची निवड नुकतीच पार पडली. राहूरी खुर्द तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी राहूरी खुर्द चे मा.उपसरपंच निसारभाई ईमाम शेख यांची निवड करण्यात आली.

राहूरी तालुक्यातील जलभूमीचे पत्रकार अशोक मंडलीक आणि दिशा शक्तीचे कार्यकारी संपादक रमेश खेमनर (पत्रकार) यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. राहूरी खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.मालतीताई साखरे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती व सदस्यांची यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उपसरपंच तुकाराम बाचकर, जेष्ठ नेते गेनूभाऊ तोडमल, माजी सरपंच इमामभाई शेख, नंदकुमार डोळस, मधुकर साळवे, आय्युब भाई पठाण, शिवाजी शेंडे, रफिकभाई शेख, उमेश बाचकर, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. निसारभाई शेख, पत्रकार अशोक मंडलिक आणि पत्रकार रमेश खेमनर, उमेश बाचकर यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली यांच्या या निवडीने राहूरी तालुक्यातील पत्रकार, राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!