राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील ताहराबाद परिसरातील रहिवासी गोरक्षनाथ शंकर औटी यांच्या वस्तीवर कोंबड्यांच्या खुरुड्याजवळ नागपंचमीच्या दिवशीच चक्क चार ते साडे चार फूट लांबीचा नाग शिकारीच्या शोधात आला.
नागाला बघून एकच तारांबळ उडाली. परंतु योगा योगाने नागपंचमीचा दिवस असल्याने व त्यामध्ये नागाचे दर्शन होताच ग्रामस्थान्नी सामंजसपणातुन नागाला कोणतीही इजा न करता त्याला शांत बसू दिले.. औटी यांच्या वस्तीवर नागराज प्रकटल्याने आजूबाजूच्या वस्त्यांवरील अनेक जन नागाला बघण्यासाठी जमा झाले.
त्याचवेळी औटी यांनी राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीवप्रेमी कृष्णा पोपळघट यांना फोन करून बोलावून घेतले.. काही वेळातच सर्पमित्र कृष्णा पोपळघट व सर्पमित्र मुजीब देशमुख हे औटी यांच्या वस्तीवर पोहोचले व त्यांनी नागाला अगदी सुखरूप पणे पकडून आपल्या ताब्यात घेऊन निसर्गात मुक्त केले.
नागाला पकडल्यानंतर सर्पमित्र पोपळघट यांनी जमलेल्या सर्व ग्रामस्थ्यांना नाग व इतर सापांबद्दल माहिती दिली व ग्रामस्थ्यांची सापांविषयीची असणारी भीती कमी करण्याचा प्रयत्न केला..त्यावेळी औटी परिवार व ग्रामस्थ यांनी सर्पमित्रांचे आभार मानले..