8.4 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील

दिल्ली ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पैठण – पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी – कासार – लोहा या राष्ट्रीय महमार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी रुपये मावेजा केंद्र सरकारने मंजूर केला असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

पैठण – पंढरपूर NH-752E या पालखी मार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या भू संपादनाचे 20.72 कोटी आणि NH-361F खरवंडी-कासार-लोहा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील चार गावांच्या संपादित जमिनीसाठी 14.18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भू संपादनाच्या मावेजा संदर्भात सातत्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडे पाठपुरावा केल्या नंतर आज केंद्र सरकारने या संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मंजूर केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी नुसारच हा मावेजा मंजूर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा मावेजा लवकरच जमा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास व दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले असून शेतकऱ्यांना देखील धन्यवाद दिले आहेत.

लवकरच या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

प्रतिक्रिया:-

पैठण – पंढरपूर या पालखी मार्गासाठी पाच वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्यातील पाच गावाची जमीन संपादन केली मात्र या जमिनीच्या मावेजा बाबत सातत्याने शेतकऱ्यांना शासनाकडे चकरा माराव्या लागल्या. या प्रकरणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे या शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे सांगितल्यावर खा.सुजय दादांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा मावेजाचे मंजूर करून दिला. सुजय दादांनी शेतकऱ्यांना दिलेल्या न्याया बद्दल दादांचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले असल्याचे भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष श्री माणिकराव खेडकर यांनी सांगितले.

मिडसांगवी तालुका पाथर्डी येथील शेतकरी तथा माजी सरपंच दत्तूनाना पठाडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आम्ही सर्व खूप परेशान झालेलो होतोत, वेळोवेळी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारले मात्र आपले खासदार सुजय दादांना याविषयी आम्ही सांगितले आणि दादांनीच आमचा हा मावेजा आम्हाला मंजूर करून आणून दिला. सुजय दादांचे खूप खूप आभार

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!