20.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

सबळ पुराव्या  अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता

राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):-लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून मुलीस पळवून नेलेचे आरोपातून आरोपीची अहमदनगर येथील जिल्हा व सेशन न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मौजे पाथरे खुर्द, गांवचे शिवारातील मुलीस तिचे पालकांचे संमतीशिवाय लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पालकांचे रखवालीतून पळवून नेले. या आरोपातून आरोपी रवि उर्फ रविंद्र सुभाष गांगुर्डे, रा. पाथरे खुर्द याची नुकतीच अहमदनगर येथील जिल्हा व सेशन न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, मौजे पाथरे खुर्द, ता. राहुरी या गांवचे शिवारात फिर्यादी यांचे राहते घराचे समोर दि.२९/०४/२०१७ रोजी फिर्यादीची मुलगी हिस लग्नाचे आमिष दाखवनू तिचे पालकांचे संमतीशिवाय कायदेशीर रखवालीतून पळवून नेले. त्यानुसार फिर्यादी याने राहुरी पोलीसात फिर्याद दिली व पोलीसांनी आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम ३६३, ३६६ प्रमाणे गुन्हा दाखल केला, त्याला ११४६/२०१७ असा एफ.आय.आर. क्रमांक पडला व पोलीसांनी सदर गुन्हयाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले. व सदर केस अहमदनगर येथील जिल्हा व सेशन कोर्ट श्रीमती एम. ए. बरालिया मॅडम यांचे समोर चालली. सदर केस मे कोर्टात चालून सबळ पुराव्या अभावी आरोप रवि उर्फ रविंद्र सुभाष गांगुर्डे याची दि.१९/०८/२०२३ रोजी मे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे जेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक अँड प्रकाश संसारे यांनी काम पाहिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!