4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करा – देविदास माळी

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा  ) :- नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे एकलव्य संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एकलव्य संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास माळी व महिला आघाडी तालुकाध्यक्ष शितलताई माळी यांच्या हस्ते विर एकलव्य प्रतिमेचे पूजन तालुकाध्यक्ष नानासाहेब बर्डे,शंकर चव्हाण, जि.उपाध्यक्ष संभाजी गायकवाड, टायगर फोर्सचे अशोक माळी, संपर्क प्रमुख नंदु बर्डे, रोहिदास माळी उपाध्यक्ष संदीप पवार,शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे,राहुरी तालुकाध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येवुन आरती करण्यात आली.

यावेळी बोलताना देविदास माळी म्हणाले की, आदिवासींना समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा मिळवुन देण्यासाठी एकलव्य संघटना काम करत आहे .आदिवासींच्या हक्कांसाठी लढायचे आहे आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी काम करायचे अशी प्रतिज्ञा आज आपण जागतिक आदिवासी दिना निमित्त करुया. आदिवासींची संस्कृती आणि परंपराही जतन केल्या पाहिजेत.

यावेळी संदीप पवार, सागर पवार हरिभाऊ पवार,विकास सोनवणे ,राहुल माळी,किरण सोनवणे,अनिल पवार,आकाश बर्डे,अंकुश पवार ,अजय बर्डे शाहराम पवार, गणेश सोनवणे,शरद पवार ,आकाश पवार ,आकाश वाघ,योगेश बेर्डे,सोण्याबापु सोनवणे ,विजय पवार,राहुल डुकरे,विजय बर्डे,सचिन पवार लक्ष्मण बेहळे ,आकाश बेहळे ,रोहिदास माळी ,सोनु माळी अजय मोरे अनिल मोरे संदीप मोरे ऋषी पवार संतोष राजपुत महेश पवार बबन सोनवणे दत्तु पवार अमर पवार अंकुश पवार आकाश माळी अनिल पवार राहुल कंक गणेश माळी वैभव वाघ मनोज हनवत नवनाथ माळी सुरज माळी अर्जुन माळी यांच्यासह जिल्ह्य़ातील एकलव्य संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!