राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):– चंद्रयान ३च्या माध्यमातून चंद्रावर भारतदेशाचा झेंडा फडकवणारे भारत देश हे चौथे राष्ट्र बनले आसुन या मोहिमेतील राहाता तालुक्यातील रांजणगाव खु. येथील शास्त्रज्ञ अमोल गाढवे यांच्या सहभागाने राहाता तालुक्याची मान अभिमानाने ऊंचावली आहे.
बारा वर्षांपासुन इस्ञोत शास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत असलेले अमोल यांनी इस्ञोच्या ञिवेंद्रम येथील महाविद्यालयात बी.टेक पदवी घेतली.तर आपले पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण सेंट जॉन इंग्लिश मिडियम स्कुल, राहाता येथे पुर्ण केले आहे.अमोल यांच्या या कार्याबद्दल शुभेच्छा देत सेंट जॉन स्कुल चे मुख्याध्यापक फा.गिलबर्ट डेनिस यांनी सांगितले की, अमोल यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत इस्ञोतील शास्त्रज्ञ होवुन भारत देशाच्या चंद्रयान मोहिमेत सहभागी होत यशाचा शिखर पार केला हे आंम्हा साठी खुप अभिमानाचे असल्याचे सांगितले तर शास्त्रज्ञ अमोल गाढवे यांनी चंद्रयान मोहिमेत प्रक्षेपकाच्या तपासणी सह सॉफ्टवेअर तयार करण्याच्या प्रक्रियेच्या सहभागाबद्दल ईस्ञोने त्यांचा गौरव करत सन्मान चिन्ह बहाल केले आहे.
या यशाबद्दल रांजणगावच्या सरपंच सुनिता कासार सोपानकाका कासार एकरुख्याचे सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, जालिंदर गाढवे, देवेंद्र भवर, शिवाजी भालेराव, रविंद्र गायकवाड, अमित कोळगे, धनंजय सोनवणे, ललित मुनावत, सागर डोखे यांनी शास्त्रज्ञ अमोल गाढवे यांच्या याशाबद्दल अभिनंदन केले
एका ग्रामीण भागातील युवकाची गगनभरारी युवकांसाठी प्रेरणादायी तर आहेच परंतु रांजणगाव ग्रामस्थांसाठी गौरवाची आहे
-अनिल गाढवे (संचालक गणेश स.सा. कारखाना)
इस्रोने भारताच्या इतिहासात मानाचा तुरा रोवाल्याने जगात देशाचा गौरव होत आहे सेंट जॉन स्कुलच्या विद्यार्थ्याचा यात सहभाग ही एक अभिमानास्पद बाब आहे यातुन यापुढे येणारे विद्यार्थी देखील याबाबत नक्कीच अनुकरण करुन भविष्यात येथून नव वैज्ञानिक बाहेर पडतील.
-(फा. फ्रान्सिस ओहळ उपमुख्याध्यापक सेंट जॉन स्कुल राहाता)